चंद्रकळा रुक्मिणी नेसली
चंद्रकळा रुक्मिणी नेसली
पाहता दर्पणी का हसली?
काजळ काळे भरता डोळी
प्रतिबिंबातुन दिसू लागली
श्रीकृष्णाची मूर्त सावळी
भीमकबाला लाज लाजली
दूताकरवी पत्र धाडिले
श्रीकृष्णाने तुझ्या वाचले
गोड कपोली उत्तर आले
प्रीत कंचुकी तिला बोलली
वधू नियोजित ती शिशुपाला
मुहूर्त मंगल समीप आला
उभी राउळी उदास बाला
तोच हरिची मुरली वाजली
पाहता दर्पणी का हसली?
काजळ काळे भरता डोळी
प्रतिबिंबातुन दिसू लागली
श्रीकृष्णाची मूर्त सावळी
भीमकबाला लाज लाजली
दूताकरवी पत्र धाडिले
श्रीकृष्णाने तुझ्या वाचले
गोड कपोली उत्तर आले
प्रीत कंचुकी तिला बोलली
वधू नियोजित ती शिशुपाला
मुहूर्त मंगल समीप आला
उभी राउळी उदास बाला
तोच हरिची मुरली वाजली
गीत | - | पी. सावळाराम |
संगीत | - | विश्वनाथ मोरे |
स्वर | - | कृष्णा कल्ले |
चित्रपट | - | माय माउली |
गीत प्रकार | - | चित्रगीत |
कंचुकी | - | चोळी. |
कपोल | - | गाल. |
चंद्रकळा | - | फक्त काळ्या रंगाची साडी. |
भीमक | - | भीष्मक. विदर्भ देशाचा राजा. रुक्मिणीचा पिता. |
राऊळ | - | देऊळ. |
शिशुपाल | - | श्रीकृष्णाचा मामेभाऊ. रुक्मिणीचा विवाह याच्याशी करावा असा भीष्मकाचा (तिच्या वडिलांचा) बेत होता. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.