चंद्र तोच अन् तेच तारे
चंद्र तोच अन् तेच तारे, तीच चांदणी रात
तू मी होतो परंतु नव्हती त्या रातीची बात
निशिगंधाचा सुंगंध उधळित तसाच आला वारा
अंगाला ग अंग लागता तसा ग फुलला शहारा
गळ्यात माझ्या तसाच प्यारा तुझा गोरटा हात
परंतु नव्हती मादकतेची सळसळ बिजली त्यात
त्याच तरूतळी किरण-सावल्या लपंडाव खेळे
तशीच अपुली नजर मिळवणी, तसेच हसले डोळे
भावगीत तू तेच गाइले त्याच रंग-रागात
परंतु नव्हते हृदय उतरले तुझ्या गोड गाण्यात
तू मी होतो परंतु नव्हती त्या रातीची बात
निशिगंधाचा सुंगंध उधळित तसाच आला वारा
अंगाला ग अंग लागता तसा ग फुलला शहारा
गळ्यात माझ्या तसाच प्यारा तुझा गोरटा हात
परंतु नव्हती मादकतेची सळसळ बिजली त्यात
त्याच तरूतळी किरण-सावल्या लपंडाव खेळे
तशीच अपुली नजर मिळवणी, तसेच हसले डोळे
भावगीत तू तेच गाइले त्याच रंग-रागात
परंतु नव्हते हृदय उतरले तुझ्या गोड गाण्यात
गीत | - | पी. सावळाराम |
संगीत | - | वसंत प्रभु |
स्वर | - | भालचंद्र पाटेकर |
गीत प्रकार | - | शब्दशारदेचे चांदणे, भावगीत |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.