चंद्र होता साक्षीला
सूर गेले दूर आता, शब्द मागे राहिला
चंद्र होता साक्षीला, चंद्र होता साक्षीला
पाहिले भेटलो बोललो प्रीतीने
पौर्णिमा लाजली हासले चांदणे
प्राण हे छेडुनी राग मी गाईला
भावना अंतरी वेदना जाहली
प्रीत मी पाहिली, रीत मी साहिली
थांबली आसवे, हुंदका थांबला
चंद्र तो रात्र ती, श्वास तो मोकळा
आज ते संपले, शून्य मी एकला
त्याग मी भोगिता स्नेह का भंगला
चंद्र होता साक्षीला, चंद्र होता साक्षीला
पाहिले भेटलो बोललो प्रीतीने
पौर्णिमा लाजली हासले चांदणे
प्राण हे छेडुनी राग मी गाईला
भावना अंतरी वेदना जाहली
प्रीत मी पाहिली, रीत मी साहिली
थांबली आसवे, हुंदका थांबला
चंद्र तो रात्र ती, श्वास तो मोकळा
आज ते संपले, शून्य मी एकला
त्याग मी भोगिता स्नेह का भंगला
गीत | - | जगदीश खेबूडकर |
संगीत | - | सुधीर फडके |
स्वर | - | सुधीर फडके |
चित्रपट | - | चंद्र होता साक्षीला |
गीत प्रकार | - | चित्रगीत, शब्दशारदेचे चांदणे |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.