चांदण्या रात्रीतले ते स्वप्न
चांदण्या रात्रीतले ते स्वप्न तू विसरून जा
मी कधी होते तुझी ते सर्व तू विसरून जा !
आणिले धागे तुझे तू मीहि माझे आणिले
गुंफिला जो गोफ त्याचा पीळ तू विसरून जा !
मी दिली वचने तुला अन् वाहिल्या शपथा खुळ्या
शब्द केवळ ते, तयांचा अर्थ तू विसरून जा !
प्रीतिचे हितगूज ते, कुजबुज ती, रुसवेहि ते
ते हसू अन् आसवे ती- आज तू विसरून जा !
चंद्र ज्याला साक्ष होता, जे फुलांनी पाहिले
रेखिले प्राणांत जे मी तेच तू विसरुन जा !

गीत | - | शान्ता शेळके |
संगीत | - | वसंत पवार |
स्वर | - | माणिक वर्मा |
राग | - | मिश्र मांड |
गीत प्रकार | - | शब्दशारदेचे चांदणे, कल्पनेचा कुंचला, भावगीत |
हितगूज | - | हिताची गुप्त गोष्ट. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.