चांद तू नभातला नि
चांद तू नभातला नि
बावळा चकोर मी
गुलाम होउनी तुझा उभा तुझ्या समोर मी
तू चंचला तू कामिनी
तू पद्मिनी तू रागिणी
तनामनात माझिया तुझी सदैव मोहिनी
उरात श्वास कोंडतो
उगा अशी नको रुसू
शोधू सांग नेमके कुठे प्रिये तुझे हसू
तू प्रेमला तू श्यामला
तू कोमला तू दामिनी
वेंधळा जरी, तरी तुझाच चित्तचोर मी
पहाट तू ग मल्मली
कोवळ्या उन्हातली
मधाळ गोड शिरशिरी शहारल्या मनातली
तू रोहिणी तू मानिनी
सखे तू चैत्र यामिनी
मेघ पावसाळी तू नि चिंब चिंब मोर मी
बावळा चकोर मी
गुलाम होउनी तुझा उभा तुझ्या समोर मी
तू चंचला तू कामिनी
तू पद्मिनी तू रागिणी
तनामनात माझिया तुझी सदैव मोहिनी
उरात श्वास कोंडतो
उगा अशी नको रुसू
शोधू सांग नेमके कुठे प्रिये तुझे हसू
तू प्रेमला तू श्यामला
तू कोमला तू दामिनी
वेंधळा जरी, तरी तुझाच चित्तचोर मी
पहाट तू ग मल्मली
कोवळ्या उन्हातली
मधाळ गोड शिरशिरी शहारल्या मनातली
तू रोहिणी तू मानिनी
सखे तू चैत्र यामिनी
मेघ पावसाळी तू नि चिंब चिंब मोर मी
गीत | - | गुरु ठाकूर |
संगीत | - | अजित-समीर |
स्वर | - | स्वप्नील बांदोडकर |
चित्रपट | - | संदूक |
गीत प्रकार | - | चित्रगीत, शब्दशारदेचे चांदणे |
चकोर | - | चांदणे हेच ज्याचे जीवन असा एक पक्षी. |
दामिनी | - | सौदामिनी, आकाशात चमकणारी वीज. |
पद्मिनी | - | कमळीण, कमळयुक्त तळे / स्त्रियांच्या चार जातींपैकी प्रथम आणि सर्वोत्तम जात / स्त्रियांचे एक नाव. |
यामिनी | - | रात्र. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.