प्रियकराची साथ आहे
मोगर्याच्या पाकळ्यांची
मखमली बरसात आहे
मंद वाहे गंधवारा
दूर चंदेरी किनारा
अमृताच्या सागरातुन
जीव-नौका जात आहे
ना तमा आता तमाची
वादळाची वा धुक्याची
आजला हातात माझ्या
साजणाचा हात आहे
गीत | - | कुसुमाग्रज |
संगीत | - | श्रीनिवास खळे |
स्वर | - | आशालता वाबगावकर |
नाटक | - | विदूषक |
गीत प्रकार | - | शब्दशारदेचे चांदणे, नाट्यसंगीत |
दुसर्या दिवशी हा बिचारा वेटर मोठ्या आशेनं रायबहाद्दरांच्या ऑफिसमध्ये जाई. या वेटरचं एका आंधळ्या मुलीवर प्रेम असतं. तिला दृष्टी परत मिळवून द्यावी, तिच्याशी आपलं लग्न व्हावं, ही मनोमन त्याची इच्छा असते आणि रायबहाद्दरांच्या कृपेमुळे ते स्वप्न साकार होईलच, अशी त्याला शंभर टक्के खात्री वाटत असते. पण दिवसाचे रायबहाद्दर वेगळे असतात- ते त्याला ओळखतही नाहीत- उलट नोकराकरवी त्याला धक्के मारून बाहेर घालवीत. त्या आंधळ्या मुलीचं काम आशालतानं केलं होतं.
विशेषतः शेवटच्या अंकातील रायबहाद्दरांचे परिवर्तन फारत हृद्य, मनाला खोलवर भिडणारं होतं. वेटरबरोबरचे त्यांचे संवादही हृदयस्पर्शी होते. हा सीन करताना मीही गलबलून जात असे.
या नाटकात 'विदूषकाचं काम गणेश सोळंकी करीत होते. तशी सगळ्यांचीच कामं चांगली होत होती. दुर्दैवानं हे नाटक अल्पायुषी ठरले. पन्नास प्रयोगांतच ते संपलं. या नाटकाची एक हृद्य आठवण मनात जपून ठेवली आहे. नानासाहेब फाटक 'शिवाजी मंदिर'च्या प्रत्येक प्रयोगाला हजर राहात, मनापासून दाद देत. कदाचित रायबहाद्दर या व्यक्तिमत्वात त्यांना तेच गवसत असावेत. रायबहाद्दर ही माझी अतिशय आवडती भूमिका. डॉक्टरसाहेबांनाही या नाटकातील माझी भूमिका फार आवडली.
(संपादित)
दत्ता भट
'झाले मृगजळ आता जलमय' या दत्ता भट यांच्या आत्मचरित्रातून.
सौजन्य- आरती प्रकाशन, डोंबिवली.
* ही लेखकांची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.