A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
चल सोडून हा देश पक्षिणी

आईलाही विसरून जाती या देशातील पिले अडाणी
चल सोडून हा देश पक्षिणी

विराण झाले अरण्य सारे
भणभण करते भीषण वारे
दिसे न कोठे कण अन्‍नाचा, कुठे दिसेना पाणी

मोडून पडली घरटी-कोटी
कशी राहशील इथे एकटी
इथे न नांदे कोणी जिवलग, नसे आप्तही कोणी

उडुन उंच जा ऊर्ध्व दिशेला
मार्ग मानिनी अन्य न तुजला
स्वार्थाविण ना धर्म जाणिती खुळे येथले प्राणी