बिब्बं घ्या बिब्बं शिक्कंकाई
बिब्बं घ्या बिब्बं, शिक्कंकाई
आज आले, उद्या मी येणार बी न्हाई
औंदा लगीन करायचं हाय मला देखणा नवरा हवा ग बाय
बिब्बं घ्या बिब्बं शिक्कंकाई
गल्ली बोळातनं वरडत जाई
कोकण्या नवरा हवा ग बाई, मला कोकण्या नवरा हवा ग
मला झांपाच्या झोपडीत ठेवीन ह्यो,
मला ताडाचं ताडगोळं देईल ह्यो
मला दर्याकिनारी नेईल ह्यो
अंगानं बुटका, बोलण्यात नेटका, एकच घोटाळा होई
त्याच्या शेंडीची गाठ मला सुटायची न्हाई,
मला कोकण्या नवरा नको ग बाई
वर्हाडी नवरा हवा ग बाई, मला वर्हाडी नवरा हवा ग
मी वर्हाडी नवरा पाह्यलाय ग,
बाग संत्र्याची करून र्हायलाय ग
भाव कापसाचा तेजीत वाढलाय ग
अंगानं भक्कम, खिशात रक्कम, एकच घोटाळा होई
मी उन्हाचा फटका खायाची न्हाई,
मला वर्हाडी नवरा नको ग बाई
मला कोल्हपुरी नवरा हवा ग बाई, मला कोल्हापुरी नवरा हवा ग
नवरा बगीन कोल्हापुरी, कोल्हापुरी !
दूध पिऊन तालीम करी, कोल्हापुरी !
त्याच्या अंगात लई सुरसुरी ग बाई,
त्याच्या अंगात लई सुरसुरी
तमाशा बघता, घरला येता, एकच घोटाळा होई
मला मिरचीचा झटका सोसायचा न्हाई
मला कोल्हापुरी दामला नको ग बाई
मुंबईचा नवरा हवा ग बाई मला मुंबईचा नवरा हवा ग
माझा नवरा मुंबईवाला
त्याच्या लोकलचा टाईम झाला
रोज न्याराच करतोय चाळा
केसांचा कोंबडा, मफलर तांबडा, एकच घोटाळा होई
त्याच्या पँटवर माझा भरवसा न्हाई
मला कंचाच नवरा नको ग बाई
आज आले, उद्या मी येणार बी न्हाई
औंदा लगीन करायचं हाय मला देखणा नवरा हवा ग बाय
बिब्बं घ्या बिब्बं शिक्कंकाई
गल्ली बोळातनं वरडत जाई
कोकण्या नवरा हवा ग बाई, मला कोकण्या नवरा हवा ग
मला झांपाच्या झोपडीत ठेवीन ह्यो,
मला ताडाचं ताडगोळं देईल ह्यो
मला दर्याकिनारी नेईल ह्यो
अंगानं बुटका, बोलण्यात नेटका, एकच घोटाळा होई
त्याच्या शेंडीची गाठ मला सुटायची न्हाई,
मला कोकण्या नवरा नको ग बाई
वर्हाडी नवरा हवा ग बाई, मला वर्हाडी नवरा हवा ग
मी वर्हाडी नवरा पाह्यलाय ग,
बाग संत्र्याची करून र्हायलाय ग
भाव कापसाचा तेजीत वाढलाय ग
अंगानं भक्कम, खिशात रक्कम, एकच घोटाळा होई
मी उन्हाचा फटका खायाची न्हाई,
मला वर्हाडी नवरा नको ग बाई
मला कोल्हपुरी नवरा हवा ग बाई, मला कोल्हापुरी नवरा हवा ग
नवरा बगीन कोल्हापुरी, कोल्हापुरी !
दूध पिऊन तालीम करी, कोल्हापुरी !
त्याच्या अंगात लई सुरसुरी ग बाई,
त्याच्या अंगात लई सुरसुरी
तमाशा बघता, घरला येता, एकच घोटाळा होई
मला मिरचीचा झटका सोसायचा न्हाई
मला कोल्हापुरी दामला नको ग बाई
मुंबईचा नवरा हवा ग बाई मला मुंबईचा नवरा हवा ग
माझा नवरा मुंबईवाला
त्याच्या लोकलचा टाईम झाला
रोज न्याराच करतोय चाळा
केसांचा कोंबडा, मफलर तांबडा, एकच घोटाळा होई
त्याच्या पँटवर माझा भरवसा न्हाई
मला कंचाच नवरा नको ग बाई
गीत | - | जगदीश खेबूडकर |
संगीत | - | राम कदम |
स्वर | - | कृष्णा कल्ले |
चित्रपट | - | सोंगाड्या |
गीत प्रकार | - | चित्रगीत, लावणी |
झांपा | - | गवत, कामट्या इ. चा केलेला दरवाजा. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.