भेटीची आवडी उताविळ मन
भेटीची आवडी उताविळ मन ।
लागलेंसे ध्यान जीवीं जीवा ॥१॥
आतां आवडीचा पुरवावा सोहळा ।
येउनी गोपाळा क्षेम देई ॥२॥
नेत्र उन्मिळत राहिले तटस्थी ।
गंगा अश्रुपाती वाहविली ॥३॥
तुका ह्मणे तुह्मी करा साचपणा ।
मुळींच्या वचना आपुलिया ॥४॥
लागलेंसे ध्यान जीवीं जीवा ॥१॥
आतां आवडीचा पुरवावा सोहळा ।
येउनी गोपाळा क्षेम देई ॥२॥
नेत्र उन्मिळत राहिले तटस्थी ।
गंगा अश्रुपाती वाहविली ॥३॥
तुका ह्मणे तुह्मी करा साचपणा ।
मुळींच्या वचना आपुलिया ॥४॥
गीत | - | संत तुकाराम |
संगीत | - | शांक-नील |
स्वर | - | पं. जितेंद्र अभिषेकी |
गीत प्रकार | - | संतवाणी, भक्तीगीत |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.