भातुकली उधळली अचानक
भातुकली उधळली अचानक
रुसे बाहुला, खिन्न बाहुली
भातुकली उधळली !
पाटालागी पाट लावुनी
चूलबोळकी त्यास मांडुनी
खेळ खेळता एक दिलानी
अर्ध्यावरती दृष्ट लागली !
पातक देवा गतजन्मीचे
या जन्मी का भोगायाचे
दूषण लागुनी अभिसाराचे
सुवासिनीची गणिका ठरली !
संसाराच्या राज्यामधली
अखेर राणी दासी ठरली
गीत भैरवी गाऊ लागली
पूर्वरात्रीला मैफल उठली !
रुसे बाहुला, खिन्न बाहुली
भातुकली उधळली !
पाटालागी पाट लावुनी
चूलबोळकी त्यास मांडुनी
खेळ खेळता एक दिलानी
अर्ध्यावरती दृष्ट लागली !
पातक देवा गतजन्मीचे
या जन्मी का भोगायाचे
दूषण लागुनी अभिसाराचे
सुवासिनीची गणिका ठरली !
संसाराच्या राज्यामधली
अखेर राणी दासी ठरली
गीत भैरवी गाऊ लागली
पूर्वरात्रीला मैफल उठली !
गीत | - | ग. दि. माडगूळकर |
संगीत | - | वसंत प्रभु |
स्वर | - | सुमन कल्याणपूर |
चित्रपट | - | दिसतं तसं नसतं |
गीत प्रकार | - | चित्रगीत |
अभिसार | - | ठरविलेल्या जागी (प्रियकराचे) भेटणे किंवा अशी जागा. |
गणिका | - | वेश्या. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.