भारतमाता माझी लावण्याची
भारतमाता माझी लावण्याची खाण
गाइन तिचे गान, मी गाइन तिचे गान
मांडिन निर्भय ठाण, मी मांडिन निर्भय ठाण
देइन माझे प्राण, देइन माझे प्राण
हाती घेतले आहे मी सतिचे वाण
जाळिन सारी घाण, मी जाळिन सारी घाण
काटिन रूढिरान, छाटिन रूढिरान
मातेला जगामध्ये देइन पहिले स्थान
नुरविन कसली वाण, मी नुरविन कसली वाण
काढिन रुतले बाण, काढिन रुतले बाण
मातेला घालीन माझ्या हातांनी मी स्नान
सर्वस्वाचे दान करिन मी, सर्वस्वाचे दान
घेतो आज मी आण, घेतो घोर मी आण
मातेला घडविन माझ्या मोक्ष-अमृतपान
गाइन तिचे गान, मी गाइन तिचे गान
मांडिन निर्भय ठाण, मी मांडिन निर्भय ठाण
देइन माझे प्राण, देइन माझे प्राण
हाती घेतले आहे मी सतिचे वाण
जाळिन सारी घाण, मी जाळिन सारी घाण
काटिन रूढिरान, छाटिन रूढिरान
मातेला जगामध्ये देइन पहिले स्थान
नुरविन कसली वाण, मी नुरविन कसली वाण
काढिन रुतले बाण, काढिन रुतले बाण
मातेला घालीन माझ्या हातांनी मी स्नान
सर्वस्वाचे दान करिन मी, सर्वस्वाचे दान
घेतो आज मी आण, घेतो घोर मी आण
मातेला घडविन माझ्या मोक्ष-अमृतपान
गीत | - | साने गुरुजी |
संगीत | - | बाळ चावरे |
स्वर | - | आकाशवाणी गायकवृंद |
गीत प्रकार | - | स्फूर्ती गीत |
टीप - • काव्य रचना- मे १९३२, धुळे तुरुंग. |
आण | - | शपथ. |
नुरणे | - | न उरणे. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.