भारतीय घटनेचा तू
भारतीय घटनेचा तू शिल्पकार आहे
सुगंधापरी तव कीर्ती दिगंतात वाहे
भक्तीभाव श्रद्धासुमने तुला अर्पिताना
कंठ दाटुनी ये आमुचा, पूर लोचनांना
तुझी स्मृती अंतःकरणी दुःख कोरताहे
शूद्र म्हणुनी जे जे मानव हीन लेखलेले
तमातून काढून त्या तू प्रकाशित केले
कोटी कोटी जनतेचा तू मार्गदीप आहे
चंदनापरी तू झिजुनी कष्ट सोसलेस
ज्ञानसूर्य तूचि आमुचा, तूच बोधिवृक्ष
तुझी कथा इतिहासाला साक्षीभूत आहे
सुगंधापरी तव कीर्ती दिगंतात वाहे
भक्तीभाव श्रद्धासुमने तुला अर्पिताना
कंठ दाटुनी ये आमुचा, पूर लोचनांना
तुझी स्मृती अंतःकरणी दुःख कोरताहे
शूद्र म्हणुनी जे जे मानव हीन लेखलेले
तमातून काढून त्या तू प्रकाशित केले
कोटी कोटी जनतेचा तू मार्गदीप आहे
चंदनापरी तू झिजुनी कष्ट सोसलेस
ज्ञानसूर्य तूचि आमुचा, तूच बोधिवृक्ष
तुझी कथा इतिहासाला साक्षीभूत आहे
गीत | - | रंगराज लांजेकर |
संगीत | - | प्रभाकर धाकटे |
स्वर | - | वामन धाकटे |
गीत प्रकार | - | भीम गीत / बुद्ध गीत |
तम | - | अंधकार. |
दिगंतर | - | सर्वदूर. |
बोधिवृक्ष | - | ज्ञानाचा वृक्ष. बोधगया येथील महाबोधी विहाराच्या पश्चिमेला असलेल्या पिंपळाच्या वृक्षाखाली सिद्धार्थ गौतम यांना इ.स.पू. ५२८ मध्ये वयाच्या ३५ व्या वर्षी संबोधी (ज्ञान) प्राप्ती होऊन ते बुद्ध झाले, तेव्हापासून पिंपळांच्या झाडाला बोधिवृक्ष संबोधिण्यात येते. |
साक्षीभूत | - | प्रत्ययास आणून देणारा. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.