A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
भर तारुण्याचा मळा

भर तारुण्याचा मळा, कमळिणी कळा, फुलांचा भार
डोळ्यांतून हलका पाऊस भिजला, मोरनी झालंय भार

बहरलं केवड्याचं रान, दरवळे पान पान पान
जाळीमंदी लपल्या ग पोरी, गोरी त्या छान छान छान

अलवार फुलांची होरी, राजस गोरी गहिनागौर
ह्या कळ्याफुलांच्या देठांमधले रंग सये गर्भार

देहाला डसले जहर तयाची लहर पेटते ओठी
हा बहर कहर अंगात, विकावी रात पांखरासाठी

पौषात हिवाळी रात गळ्यामंदी हात गच्च गुंफावे
मोकळ्या खुळ्या देहाच्या विभवांवरी जाणते रावे

भर तारुण्याचा मळा, कमळिणी कळा, गगन घनदाट
डोळ्यांत लालसर गडद गर्दशी स्पर्शजांभळी रात