बेडकीच्या पिल्लानं बैल
बेडकीच्या पिल्लानं बैल पाहिला !
'हम्मा, हम्मा', आवाज ऐकून पळे दूर
एवढा मोठ्ठा देह पाहुनी बेडुक घाबरला !
धावत धावत तळ्यात आले, सगळे बेडुक सावध झाले.
पाहून बेडकीबाईला, पिल्लू बिलगे आईला.
बेडकी म्हणते, "डराँव डराँव, का थरथरता बेडुकराव?"
दोन बाजूला हात पसरले, पिल्लू सारे सांगू लागले,
"एवढा मोठ्ठा, प्राणी आता, तळ्याच्या काठी चरत होता.
लठ्ठ चांगला असा भला !"
बेडकी म्हणाली, "डराँव डराँव, केवढा मोठ्ठा सांगा नाव?
जगात सार्या माझ्यापेक्षा, मोठा नाही कुणीच राव !"
पुढे येउनी, अंग फुगवुनी, पिल्लाला पाही विचारुनी,
"एवढा मोठ्ठा?"
"नाही आई याहुनी मोठ्ठा !"
पुन्हा तियेने अंग फुगविले, "एवढा मोठ्ठा?"
"नाही, नाही याहुनी मोट्ठा !"
बेडकी राही फुगवित पोटा, पिल्लू म्हणे तर याहून मोठ्ठा !
बघताबघता फट्ट जाहले, बेडकीचे मग पोटच फुटले !
अंगी नसता खरी योग्यता, उगाच करता बरोबरी
जिवास मुकली खुळी बेडकी, तिची मोडली खोड पुरी !
म्हणून बढाई नको मुलांनो, खरं सांगतो तुम्हाला

गीत | - | शांताराम नांदगांवकर |
संगीत | - | सी. रामचंद्र |
स्वर | - | सी. रामचंद्र |
गीत प्रकार | - | बालगीत |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.