बंद ओठांनी निघाला
बंद ओठांनी निघाला पेटलेला एकला
दाटलेल्या अंतरीचा सूर झाला मोकळा
का दुभंगु का नये हा क्षितिज पडदा एकदा
फक्त कानी येत त्याच्या येथ दिडदा सर्वदा
कोण होता तेही आता आठवेना त्याजला
दाटलेल्या अंतरीचा सूर झाला मोकळा
लोळ आला अन् विजेचा रान सारे पेटले
भूत जन्मापूर्वीचे त्या तेथ त्याला भेटले
वादळापूर्वीच झाला तो निनावी एकला
दाटलेल्या अंतरीचा सूर झाला मोकळा
दाटलेल्या अंतरीचा सूर झाला मोकळा
का दुभंगु का नये हा क्षितिज पडदा एकदा
फक्त कानी येत त्याच्या येथ दिडदा सर्वदा
कोण होता तेही आता आठवेना त्याजला
दाटलेल्या अंतरीचा सूर झाला मोकळा
लोळ आला अन् विजेचा रान सारे पेटले
भूत जन्मापूर्वीचे त्या तेथ त्याला भेटले
वादळापूर्वीच झाला तो निनावी एकला
दाटलेल्या अंतरीचा सूर झाला मोकळा
गीत | - | आरती प्रभू |
संगीत | - | भास्कर चंदावरकर |
स्वर | - | रवींद्र साठे |
चित्रपट | - | सर्वसाक्षी |
गीत प्रकार | - | चित्रगीत |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.