A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
बाळपणींचा काळ सुखाचा

बाळपणींचा काळ सुखाचा, आठवतो घडि घडी ।
तशि नये फिरुन कधिं घडी ॥

किति हौसेनें टाकिलि असती त्यांत मागुती उडी ।
परि दुबळी मानवकुडी ।
मनिं नव्हति कशाची चिंता ।
आनंद अखंडित होता ।
आक्रोश कारणापुरता ।
जें ब्रह्म काय तें मायबाप ही जोडी ।
खेळांत काय ती गोडी ॥