बाळा होऊ कशी उतराई
बाळा होऊ कशी उतराई?
तुझ्यामुळे मी झाले आई
तुझ्या मुखाचे चुंबन घेता, हृदयी भरते अमृत सरिता
तव संजीवन तुला पाजिता, संगम होता उगमा ठायी
गाई झुरुझुरु तुज अंगाई
माय भुकेला तो जगजेठी, तुझ्या स्वरूपी येऊन पोटी
मंत्र 'आई' जपता ओठी, महान मंगल देवाहुन मी
मातृदैवत तुझेच होई

गीत | - | पी. सावळाराम |
संगीत | - | वसंत प्रभु |
स्वर | - | लता मंगेशकर |
गीत प्रकार | - | भावगीत |
उतराई | - | ऋणमुक्त. |
जगजेठी | - | जगतात ज्येष्ठ असा तो, परमेश्वर. |
ठाय | - | स्थान, ठिकाण. |
संजीवन | - | पुनुरुज्जीवन. |
संजीवनी | - | नवजीवन / मेलेला प्राणी जिवंत करणारी विद्या. |
सरिता | - | नदी. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.