A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
बळ ज्याचें त्यास तें

बळ ज्याचें त्यास तें ॥

मंथनविष जग जाळित सुटलें, विष्णु न घे, विधि तोहि न घे, शिव सहजीं पचवि तें ॥

वयोवृद्ध परि त्या शंभूनें । उगाचि कां, जी कुमारिका, वरिलें त्या गौरिते ॥

शक्ति तशी माझ्याही अंगीं म्हणुनि हवी स्त्री तरुण नवी । यात चुके कोणतें? ॥
गीत - गो. ब. देवल
संगीत - गो. ब. देवल
स्वर-
नाटक - शारदा
चाल-विधितनये पाव गे
गीत प्रकार - नाट्यसंगीत
  
टीप -
• या गीताचे मूळ ध्वनीमूद्रण आमच्याकडे नाही. आपल्याकडे असल्यास, कृपया aathavanitli.gani@gmail.com या इ-पत्त्यावर पाठवा. ते रसिकांना ऐकण्यासाठी इथे उपलब्ध करून दिले जाईल.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.