बैसले मी पायथ्याशी
बैसले मी पायथ्याशी, तू उभा शिखरावरी
वेडी का रे जाहले मी व्यर्थ ऐशी अंतरी
केवढा तू दिव्य तारा शोभसी गगनांगणी
मी शिळा धरणीवरी या, का उगा झुरते मनी
दाटला अंधार येथे, राहु कैशी एकली
फेक रे किरणास एका सोबती माझ्या जगी
आणिला किति वेग पायी यावया तुजपाशी मी
भेट कैसी होइना रे आपुली जन्मांतरी
वेडी का रे जाहले मी व्यर्थ ऐशी अंतरी
केवढा तू दिव्य तारा शोभसी गगनांगणी
मी शिळा धरणीवरी या, का उगा झुरते मनी
दाटला अंधार येथे, राहु कैशी एकली
फेक रे किरणास एका सोबती माझ्या जगी
आणिला किति वेग पायी यावया तुजपाशी मी
भेट कैसी होइना रे आपुली जन्मांतरी
गीत | - | मो. ग. रांगणेकर |
संगीत | - | ज्योत्स्ना भोळे |
स्वर | - | ज्योत्स्ना भोळे |
गीत प्रकार | - | भावगीत |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.