बाई ग
राती ह्या कण कण सरत जाती
व्याकुळ हे नयन सख्या,
नजर उताविळ घडीभर राहिना
बाई ग, कसं करमत न्हाई ग !
घाव उरी बसला, कृष्णसखा दिसला
अवचित वेणू घेऊन हाता
मनमोहन मन चोरून जाता
सुदबूद हरपून जाई ग !
बाई ग, कसं करमत न्हाई ग !
श्वास रंगती प्राण गुंफती अधर झंकारी
उमलते उरी मधुर बासरी देही घुमणारी
फुलवितो कळी हळुच कोवळी अधीर झुरणारी
भुलवतो जरी हरवते तरी वेदना सारी
शिरशिरी तनूवर फुलते अशी
श्रावणी सर बरसावी जशी
मी मला विसरुन जाता अशी
बंधने विरघळली छळणारी
लाज मालवुनी या मनात कुणी चांदरात शिलगावी ग
काळजात कळ रात रात भर जागवून जीव जाळी ग
शाम शाम बंधनात देई साद वेणूनाद बाई ग
रास रंगवून चित्त दंगवून सावळा सजण जाई ग
मोहरल्या कायेवर मोरपीस थरथर रातदिस आठवत राही ग
बाई ग, कसं करमत न्हाई ग !
व्याकुळ हे नयन सख्या,
नजर उताविळ घडीभर राहिना
बाई ग, कसं करमत न्हाई ग !
घाव उरी बसला, कृष्णसखा दिसला
अवचित वेणू घेऊन हाता
मनमोहन मन चोरून जाता
सुदबूद हरपून जाई ग !
बाई ग, कसं करमत न्हाई ग !
श्वास रंगती प्राण गुंफती अधर झंकारी
उमलते उरी मधुर बासरी देही घुमणारी
फुलवितो कळी हळुच कोवळी अधीर झुरणारी
भुलवतो जरी हरवते तरी वेदना सारी
शिरशिरी तनूवर फुलते अशी
श्रावणी सर बरसावी जशी
मी मला विसरुन जाता अशी
बंधने विरघळली छळणारी
लाज मालवुनी या मनात कुणी चांदरात शिलगावी ग
काळजात कळ रात रात भर जागवून जीव जाळी ग
शाम शाम बंधनात देई साद वेणूनाद बाई ग
रास रंगवून चित्त दंगवून सावळा सजण जाई ग
मोहरल्या कायेवर मोरपीस थरथर रातदिस आठवत राही ग
बाई ग, कसं करमत न्हाई ग !
गीत | - | गुरु ठाकूर |
संगीत | - | अजय-अतुल |
स्वर | - | आर्या आंबेकर |
चित्रपट | - | चंद्रमुखी |
गीत प्रकार | - | चित्रगीत |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.