A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
बहरला पारिजात दारी

बहरला पारिजात दारी
फुले का पडती शेजारी?

माझ्यावरती त्यांची प्रीती
पट्टराणी जन तिजसी म्हणती
दुःख हे भरल्या संसारी !

असेल का हे नाटक यांचे
मज वेडीला फसवायाचे?
कपट का करिती चक्रधारी?

का वारा ही जगासारखा
तिचाच झाला पाठीराखा
वाहतो दौलत तिज सारी !