A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
बघुनि सुभद्रेला

बघुनि सुभद्रेला । कसा यति वेडावुनि गेला ॥

हस्तांतिल ती गोमुखि गळली ।
आशीर्वचनीं जिव्हा चळली ।
नासिकाग्र दृष्टीही वळली ।
निर्लज्जचि झाला ।
टकमक मुख ते बघण्याला ॥