A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
बघता हसुनी तू मला

बघता हसुनी तू मला
का लाज वाटे मला

नकळत कितीदा येऊन मी
बसले तुजला बिलगुन मी
आज परि मी आतुरलेली तुजजवळी यायला

हसता रुसता फुललेली
गोड कपोली खुललेली
मधुमासांची मोहक लाली आज ती बघायला

बावरले मी, जवळी ये
स्वप्‍नी अपुल्या मजला ने
बोल मनीचे अबोल राणी येता बोलायला