बघा ना छळतो हा
बघा ना छळतो हा, छळतो हा वारा असा?
ओढुनी अंचल हा, अंचल हा पळतो असा !
आळ वृथा का या वार्यावर, वार्याहुन मन चंचल, आवर !
कशी आवरु हलता झुलता तव नयनांचा आरसा !
इथेच झाले नील जलावर, स्वर्ग-धरेचे मीलन सुंदर
प्रतिबिंबाला बिंब पाहता वेडावुनी मज राजसा !
भावमधूर ही फुले मनोहर, बहरून आली पर्णपाचूवर
सहवासाचा सुगंध अपुला परिमळ तो हा गोडसा !

गीत | - | पी. सावळाराम |
संगीत | - | वसंत प्रभु |
स्वर | - | आशा भोसले, दशरथ पुजारी |
चित्रपट | - | बायकोचा भाऊ |
गीत प्रकार | - | चित्रगीत, युगुलगीत |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.