बागेत जाउं नको
बागेत जाउं नको, जाउं नको
मम प्रीतीचें घालिन पाणी
सांजसकाळी गाइन गाणी
नाचवीन मंद श्वसनांनीं
ओवाळिन तुजवर जिनगानी
जाउं नको, जाउं नको !
मम प्रीतीच्या फुला चिमुकल्या
ह्या तेजाच्या दिवट्या इवल्या
तूं जाशिल तर विझतिल सगळ्या
मम हृदयांतिल फुला एकट्या
जाउं नको, जाउं नको !
सर्व सुनें मज तुझ्यावाचुनी
करावयाचें काय वांचुनी
व्यर्थ जगाच्या पुढे नाचुनी
तुझ्याचसाठीं मी फुलमाळी
जाउं नको, जाउं नको !
मम प्रीतीचें घालिन पाणी
सांजसकाळी गाइन गाणी
नाचवीन मंद श्वसनांनीं
ओवाळिन तुजवर जिनगानी
जाउं नको, जाउं नको !
मम प्रीतीच्या फुला चिमुकल्या
ह्या तेजाच्या दिवट्या इवल्या
तूं जाशिल तर विझतिल सगळ्या
मम हृदयांतिल फुला एकट्या
जाउं नको, जाउं नको !
सर्व सुनें मज तुझ्यावाचुनी
करावयाचें काय वांचुनी
व्यर्थ जगाच्या पुढे नाचुनी
तुझ्याचसाठीं मी फुलमाळी
जाउं नको, जाउं नको !
गीत | - | कवी अनिल |
संगीत | - | गजानन वाटवे |
स्वर | - | गजानन वाटवे |
गीत प्रकार | - | भावगीत |
टीप - • काव्य रचना- ५ ऑगस्ट १९२२. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.