बाळ गुणी तू कर अंगाई
बाळ गुणी तू कर अंगाई
जोजविते रे तुजला आई !
तुझा चंदनी लाल पाळणा
जाईजुईचा मऊ बिछाना
झुलती वरती राघूमैना
मागेपुढती झोका जाई
निजले तारे निजले वारे
शांत झोपली रानपाखरे
जग भवतीचे निजले सारे
चंद्रही करितो गाई गाई
मंद पाउली येते रजनी
शिणले डोळे जागजागुनी
अजुनी मिटेना कशी पापणी?
नीज लडिवाळा नीज लवलाही
जोजविते रे तुजला आई !
तुझा चंदनी लाल पाळणा
जाईजुईचा मऊ बिछाना
झुलती वरती राघूमैना
मागेपुढती झोका जाई
निजले तारे निजले वारे
शांत झोपली रानपाखरे
जग भवतीचे निजले सारे
चंद्रही करितो गाई गाई
मंद पाउली येते रजनी
शिणले डोळे जागजागुनी
अजुनी मिटेना कशी पापणी?
नीज लडिवाळा नीज लवलाही
गीत | - | शान्ता शेळके |
संगीत | - | राम कदम |
स्वर | - | सुधीर फडके, सुमन कल्याणपूर |
चित्रपट | - | भाग्यलक्ष्मी |
गीत प्रकार | - | चित्रगीत |
लवलाही | - | लवकर. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.