A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
बा रे पांडुरंगा केव्हा

बा रे पांडुरंगा केव्हां भेट देशी ।
झालों मी परदेशी तुझ्याविण ॥१॥

ओवाळावी काया चरणावरोनि ।
केव्हां चक्रपाणि भेटशील ॥२॥

तुका ह्मणे माझी पुरवावी आवडी ।
वेगें घालीं उडी नारायणा ॥३॥