औंदा लगीन करायचं (१)
दाटु लागली उरांत चोळी कुठवर आता जपायचं
औंदा लगीन करायचं मला औंदा लगीन करायचं
रस्त्यानं जाताना बघत्यात किती
गालांतल्या गालांत हसत्यात किती
पदर सारखा ढळतोय ग किती तयाला आवरायचं
मनात ठसतोय कुणीतरी
उरात होतंय् कसंतरी
झोप रातिला येइना मुळी सपनात कुनितरि बघायचं
धक्का मारत्यात रस्त्यामधी
खळबळ होतिया मनामधी
मनासारखा हवा गडी कुठवर बाई थांबायचं
औंदा लगीन करायचं मला औंदा लगीन करायचं
रस्त्यानं जाताना बघत्यात किती
गालांतल्या गालांत हसत्यात किती
पदर सारखा ढळतोय ग किती तयाला आवरायचं
मनात ठसतोय कुणीतरी
उरात होतंय् कसंतरी
झोप रातिला येइना मुळी सपनात कुनितरि बघायचं
धक्का मारत्यात रस्त्यामधी
खळबळ होतिया मनामधी
मनासारखा हवा गडी कुठवर बाई थांबायचं
गीत | - | म. पां. भावे |
संगीत | - | विश्वनाथ मोरे |
स्वर | - | सुलोचना चव्हाण |
गीत प्रकार | - | लावणी |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.