अस्मिता
सावलीही अशात हसते
ठावठिकाणा माझा पुसते
मीच मला मग शोधत बसते
बोल मला तू हळुवार काही
सांग भले तू माझा नाही
कलीयुगातली मी मीराबाई
मौनातले हे शब्द बोलके
तुझ्या नि माझ्या ओठी हलके
असुनी नयनी अश्रू पोरके
क्षणात आता सरतील लाटा
पक्षी घराच्या धरतील वाटा
देईल हात तुझी अस्मिता
अस्मिता अस्मिता
जळता जळता एक ज्योती
अंधाराला सांगत होती
होती सच्ची माझी प्रीती
क्षणात आता सरतील लाटा
पक्षी घराच्या धरतील वाटा
देईल हात तुझी अस्मिता
अस्मिता अस्मिता
ठावठिकाणा माझा पुसते
मीच मला मग शोधत बसते
बोल मला तू हळुवार काही
सांग भले तू माझा नाही
कलीयुगातली मी मीराबाई
मौनातले हे शब्द बोलके
तुझ्या नि माझ्या ओठी हलके
असुनी नयनी अश्रू पोरके
क्षणात आता सरतील लाटा
पक्षी घराच्या धरतील वाटा
देईल हात तुझी अस्मिता
अस्मिता अस्मिता
जळता जळता एक ज्योती
अंधाराला सांगत होती
होती सच्ची माझी प्रीती
क्षणात आता सरतील लाटा
पक्षी घराच्या धरतील वाटा
देईल हात तुझी अस्मिता
अस्मिता अस्मिता
गीत | - | अरविंद जगताप |
संगीत | - | अशोक पत्की |
स्वर | - | आरती अंकलीकर-टिकेकर, त्यागराज खाडीलकर |
गीत प्रकार | - | मालिका गीत |
टीप - • शीर्षक गीत, मालिका- अस्मिता, वाहिनी- सह्याद्री. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.