अशी नजर घातकी बाई
अशी नजर घातकी बाई ग
उभ्या उन्हात सुकली जाई ग
फळ रसाळ जातील वाया
उरी उगा लागलं धडकाया
जीवाभावाचं मला कुणी नाही ग
अंगी ज्वानी ऐन सोळाची
मनी भीती अशा खेळाची
कुठं पाऊल घसरून जाई ग
किती लाजून झाले चूर
काळजाची बेहोष हुरहुर
नवतीची अशी नवलाई ग
उभ्या उन्हात सुकली जाई ग
फळ रसाळ जातील वाया
उरी उगा लागलं धडकाया
जीवाभावाचं मला कुणी नाही ग
अंगी ज्वानी ऐन सोळाची
मनी भीती अशा खेळाची
कुठं पाऊल घसरून जाई ग
किती लाजून झाले चूर
काळजाची बेहोष हुरहुर
नवतीची अशी नवलाई ग
गीत | - | शांताराम नांदगांवकर |
संगीत | - | श्रीनिवास खळे |
स्वर | - | कृष्णा कल्ले |
गीत प्रकार | - | भावगीत, नयनांच्या कोंदणी |
नवती | - | तारुण्याचा भर. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.