असेच हे कसेबसे
असेच हे कसेबसे
कसेतरी जगायचे
कुठेतरी.. कधीतरी..
असायचे.. नसायचे.
असाच हा गिळायचा
गळ्यामधील हुंदका
कसेबसे तगायचे
धरून धीर पोरका.
असाच श्वास तोकडा
पुन्हा पुन्हा धरायचा
असाच जन्म फाटका
पुन्हा पुन्हा शिवायचा.
असेच पेटपेटुनी
पुन्हा पुन्हा विझायचे
हव्या हव्या क्षणासही
नको नको म्हणायचे.
असेच निर्मनुष्य मी
जिथे तिथे असायचे
मनात सूर्य वेचुनी
जनात मावळायचे.
कसेतरी जगायचे
कुठेतरी.. कधीतरी..
असायचे.. नसायचे.
असाच हा गिळायचा
गळ्यामधील हुंदका
कसेबसे तगायचे
धरून धीर पोरका.
असाच श्वास तोकडा
पुन्हा पुन्हा धरायचा
असाच जन्म फाटका
पुन्हा पुन्हा शिवायचा.
असेच पेटपेटुनी
पुन्हा पुन्हा विझायचे
हव्या हव्या क्षणासही
नको नको म्हणायचे.
असेच निर्मनुष्य मी
जिथे तिथे असायचे
मनात सूर्य वेचुनी
जनात मावळायचे.
गीत | - | सुरेश भट |
संगीत | - | अशोक पत्की |
स्वराविष्कार | - | ∙ सुरेश वाडकर ∙ देवकी पंडित ( गायकांची नावे कुठल्याही विशिष्ट क्रमाने दिलेली नाहीत. ) |
चित्रपट | - | आम्ही असू लाडके |
गीत प्रकार | - | चित्रगीत |
तोकडा | - | आखुड / कमी / अपुरा. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.