हा प्रभुराजा जिवासि एक निवारा ॥
मज निरोप द्यावा ठेवुनि प्रेम-भावा ।
सकल-चरणिं माझा हा नमस्कार घ्यावा ॥
सफल जनन झाले, सेविलें सौख्य-सारा ।
प्रभु-चरण-विलीना जाहली आज मीरां ॥
गीत | - | स. अ. शुक्ल |
संगीत | - | हिराबाई बडोदेकर, केशवराव भोळे, सुरेशबाबू माने, सवाई गंधर्व |
स्वर | - | हिराबाई बडोदेकर |
नाटक | - | साध्वी मीराबाई |
राग | - | भैरवी |
ताल | - | दादरा |
गीत प्रकार | - | नाट्यसंगीत |
असार | - | नीरस / निष्फळ / पोकळ / नि:सत्त्व. |
नूतन संगीत विद्यालयाकरितां 'साध्वी मीरांबाई' हा खेळ लिहून देण्याविषयीं माझे परम मित्र श्रीयुत सदाशिव अनंत शुक्ल यांस मी विनंति केली व त्या प्रमाणें त्यांनी सदहू खेळ फार परिश्रम करून लिहिला.
त्याचा प्रथम प्रयोग करण्याचा सुदिन आज लाभला या बद्दल अत्यंत आनंद वाटत आहे. नूतन संगीत विद्यालयानें जनता जनार्दनाच्या चरणीं हें पहिले नवीन पुष्प वाहिलें आहे. विद्यालयाच्या या नवीन उपक्रमाचें सर्व श्रेय सौ. हिराबाईच्या मातोश्री श्रीमती ताराबाई यांसच दिलें पाहिजे, आरंभापासून आतांपर्यंत नाटकाच्या निवडीच्या, सजावटीच्या वगैरे हरएक बाबतीत त्यांचीच बहुमोल मदत झालेली आहे.
(संपादित)
कु. स. हर्डीकर
दि. ८ फेब्रुवारी १९३०
'साध्वी मीरांबाई' या नाटकाच्या पुस्तकाच्या प्रथमावृत्तीच्या प्रस्तावनेतून.
सौजन्य- परचुरे, पुराणिक आणि मंडळी, मुंबई.
* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.