असा कसा खट्याळ तुझा
गोकुळीच्या ग आम्ही नारी, छळितो बाई तुझा मुरारी
खोड्या करितो ग अमुच्या भारी
असा कसा खट्याळ तुझा कान्हा, यशोदे तुझा कान्हा
काही केल्या मला आवरेना ग बाई आवरेना !
मध्यरात्री आला चोरावाणी
यांची बांधिली दाढी आणि माझी वेणी
ओढाओढीत मोडल्या आमच्या माना
काही केल्या मला आवरेना ग बाई आवरेना !
मथुरेची हा अडवितो ग वाट
फोडितो दह्यादुधांचे ग माठ
भर रस्त्यात घाली धिंगाणा
काही केल्या मला आवरेना ग बाई आवरेना !
ऐकुनी मुरलीचे सूर
लागते मनी हुरहुर
घरकामात मन करमेना
काही केल्या मला आवरेना ग बाई आवरेना !
खोड्या करितो ग अमुच्या भारी
असा कसा खट्याळ तुझा कान्हा, यशोदे तुझा कान्हा
काही केल्या मला आवरेना ग बाई आवरेना !
मध्यरात्री आला चोरावाणी
यांची बांधिली दाढी आणि माझी वेणी
ओढाओढीत मोडल्या आमच्या माना
काही केल्या मला आवरेना ग बाई आवरेना !
मथुरेची हा अडवितो ग वाट
फोडितो दह्यादुधांचे ग माठ
भर रस्त्यात घाली धिंगाणा
काही केल्या मला आवरेना ग बाई आवरेना !
ऐकुनी मुरलीचे सूर
लागते मनी हुरहुर
घरकामात मन करमेना
काही केल्या मला आवरेना ग बाई आवरेना !
गीत | - | कवी संजीव |
संगीत | - | वसंतकुमार मोहिते |
स्वर | - | आशा भोसले |
चित्रपट | - | भाऊबीज |
गीत प्रकार | - | चित्रगीत, हे श्यामसुंदर, लावणी |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.