असा जगाचा चाले हा खेळ
असा जगाचा चाले हा खेळ, नाही कुणाचा कुणाला मेळ !
तेलही गेलं तूपही गेलं, अहो हातामध्ये धुपाटणं आलं
नको नको ते बळंच केलं, आगीमधून फुफाटी नेलं
उघड्यासंग नागडं गेलं, सारी रात ते हिवानं मेलं !
कारभार सम्दा ह्यो अनागोंदी, एक ना धड भाराभर चिंधी
खायाला आधी झोपाया मधी, अहो कामाला कधीमधी
चालत्या गाडीला घालिती खीळ, कुर्हाडीचा दांडा गोतास काळ !
द्राक्षाचा वेल लिंबावर गेला, कडू कसा तर संगतीनं झाला
हातच्या कांकणा आरसा कशाला, बैल गेला हो तो झोपा केला
जशी ही बुद्धी तशीच फळं, जावं त्या वंशा तेव्हाच कळं !
ज्याला हो चणं त्याला ना दात, बोलाची कढी बोलाचा भात
असतील शीतं जमतील भूतं, आंधळं दळतं कुत्रं पीठ खातं
काळ आला पण आली ना वेळ, पाण्यावाचून मासा तळमळं !
पहा जो खाई त्याला खवखव, गाढवाला काय गुळाची चव?
कुंपणापावेतो सरड्याची धाव, खोट्याच्या भाळी कुर्हाडीचा घाव
अर्ध्या हळकुंडी झालंय पिवळं, सुंभ जळं तरी जाईना पीळ !
न करत्याचा वार शनिवार, अहो शहाण्याला शब्दाचा मार
सांगितलं इथनं तुजला सारं की बुडत्याला काडी आधार
मोठ्या घराचा वासा पोकळ, उथळ पाण्या लई खळखळ !

गीत | - | शाहीर विठ्ठल उमप |
संगीत | - | मधुकर पाठक |
स्वर | - | शाहीर विठ्ठल उमप |
गीत प्रकार | - | लोकगीत |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.