A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
असा बालगंधर्व आता

जशा जन्मती तेज घेऊन तारा
जसा मोर घेऊन येतो पिसारा
तसा येई कंठात घेऊन गाणे,
असा बालगंधर्व आता न होणे !

रतीचे जया रूपलावण्य लाभे
कुलस्त्री जसे हास्‍य ओठात शोभे
सुधेसारखा साद, स्वर्गीय गाणे
असा बालगंधर्व आता न होणे !