अरे कोंडला कोंडला
अरे कोंडला कोंडला देव देउळी कोंडला
बारे सांडला सांडला भाव भक्तीचा सांडला
भक्तांसाठी केला उभा हा संसार
भांडाराचे दार तुझ्या हाती
नरा दिले कर, करणी देवाची
माया जोडण्याची भक्ती ठेवी
उजेड-अंधार देवाचं हे रूप
त्याचे मनी पाप ठेवू नये
कोंडलं हे पाणी, वाट द्या मोकळी
विश्वाचा तू माळी होई भक्ता
गरीब-श्रीमंत, त्याची तुला खंत
गरीबाचा संत भक्त तोची
सेवाधर्म सारा करावा मुकाट
मागे कटकट ठेवू नये
बारे सांडला सांडला भाव भक्तीचा सांडला
भक्तांसाठी केला उभा हा संसार
भांडाराचे दार तुझ्या हाती
नरा दिले कर, करणी देवाची
माया जोडण्याची भक्ती ठेवी
उजेड-अंधार देवाचं हे रूप
त्याचे मनी पाप ठेवू नये
कोंडलं हे पाणी, वाट द्या मोकळी
विश्वाचा तू माळी होई भक्ता
गरीब-श्रीमंत, त्याची तुला खंत
गरीबाचा संत भक्त तोची
सेवाधर्म सारा करावा मुकाट
मागे कटकट ठेवू नये
गीत | - | शरद निफाडकर |
संगीत | - | रामलक्ष्मण |
स्वर | - | चंद्रशेखर गाडगीळ |
चित्रपट | - | नवरे सगळे गाढव |
गीत प्रकार | - | भक्तीगीत, चित्रगीत |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.