A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
अणुमाजीं राम

अणुमाजीं राम रेणुमाजीं राम ।
तृणींकाष्ठीं राम वर्ततसे ॥१॥

बाहेरी अंतरीं राम चराचरीं ।
विश्वीं विश्वाकारीं व्यापलासे ॥२॥

रामेंविण स्थळ रितेंचि ते नाहीं ।
वर्ते सर्वांठायीं राम माझा ॥३॥

ब्रह्मा विष्णु रूद्र मूर्ती पैं जे ध्यानी
अखंड जपती रामनाम॥४॥

परसा भागवत कायावाचामनें ।
श्रीरामावाचोनी आन नेणें ॥५॥