अंतरीची विशाल स्वप्नें
अंतरीची विशाल स्वप्नें
जीवनात कधी जगेन का रे?
सांग सख्या मन्मनींच्या भावकळ्या फुलतील का रे?
प्रवाह असला जीवनाचा
सुकुन गेल्या भोळ्या आशा
मानसीची ही प्रीती न का कधी तुझ्या पालवेल का रे?
दीप मालवे या आशेचा
अंधारुनी या गेल्या वाटा
चंद्रकिरण तो तुझ्या प्रीतीचा चांदमुखा उजळील का रे?
विरून गेले स्वप्न प्रीतीचे
धुके दाटले नैराश्याचे
प्रीत आपुली अमर-ज्योती अनंतात त्या जुळतील का रे?

गीत | - | दिलीप |
संगीत | - | गजानन वाटवे |
स्वर | - | मालती पांडे |
गीत प्रकार | - | भावगीत |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.