अनंता तुला कोण पाहूं शके
अनंता तुला कोण पाहूं शके?
तुला गातसां वेद झाले मुके.
मतीमंद अंधा कसा तू दिसे?
तुझी रूपतृष्णा मनाला असे.
तुझा ठाव कोठें कळेना जरी,
गमे मानसा चातुरी माधुरी.
तरूवल्लरींना भुकी मी पुसें,
"तुम्हां निर्मिता देव कोठें वसे?"
फुलें सृष्टिचीं मानसा रंजिती,
घरीं सोयरीं गुंगवीती मती,
सुखें भिन्न हीं, येथ प्राणी चुके
कुठें चिन्मया ऐक्य लाभूं शके?
तुझें विश्व ब्रह्मांड, ही निस्तुला-
कृती गावया रे कळेना मला.
भुकी बालका माय देवा चुके,
तया पाजुनी कोण तोषूं शके?
नवीं भावपुष्पें तुला वाहिलीं,
तशी अर्पिली भक्तिबाष्पांजली
तुझ्या पद्मपत्रावरी ती स्थिरो
प्रभो ! कल्पना जल्पना त्या हरो.
तुला गातसां वेद झाले मुके.
मतीमंद अंधा कसा तू दिसे?
तुझी रूपतृष्णा मनाला असे.
तुझा ठाव कोठें कळेना जरी,
गमे मानसा चातुरी माधुरी.
तरूवल्लरींना भुकी मी पुसें,
"तुम्हां निर्मिता देव कोठें वसे?"
फुलें सृष्टिचीं मानसा रंजिती,
घरीं सोयरीं गुंगवीती मती,
सुखें भिन्न हीं, येथ प्राणी चुके
कुठें चिन्मया ऐक्य लाभूं शके?
तुझें विश्व ब्रह्मांड, ही निस्तुला-
कृती गावया रे कळेना मला.
भुकी बालका माय देवा चुके,
तया पाजुनी कोण तोषूं शके?
नवीं भावपुष्पें तुला वाहिलीं,
तशी अर्पिली भक्तिबाष्पांजली
तुझ्या पद्मपत्रावरी ती स्थिरो
प्रभो ! कल्पना जल्पना त्या हरो.
गीत | - | बा. भ. बोरकर |
संगीत | - | पं. जितेंद्र अभिषेकी |
स्वर | - | पं. जितेंद्र अभिषेकी |
गीत प्रकार | - | प्रार्थना |
टीप - • काव्य रचना- १७ जानेवारी १९२८. |
चिन्मय | - | चैतन्यमूर्ती / शुध्द ज्ञानाने, बुद्धीने (ईश्वर, ब्रह्म) युक्त. |
जल्पना | - | वल्गना, फुशारकी, बढाई / वटवट. |
तृष्णा | - | तहान. |
तोष | - | आनंद. |
निस्तुला | - | अतुलनीय. |
पद्म | - | कमळ. |
मति | - | बुद्धी / विचार. |
वल्लरी | - | वेल (वल्ली, वल्लिका). |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.