अन् हलगीच्या तालावर
अन् हलगीच्या तालावर ढोल वाजतो गा
गजा नाचतो रं कसा गजा नाचतो गा
अवं सोंड फिरं गरारा अन् पोट वाजं नगारा
अवं लाडं लाडं मारतो कसा आभाळात फवारा
अन् ढगाच्या गा रूपानं ह्यो पाणी पाजतो गा
अवं ठुमक ठुमक बशितो अन् नादामंदी उठितो
अरं खेळाची ही नशा रं, कसं दोन्ही डोळं मिटितो
अन् इंद्राचा ऐरावत ह्येला लाजतो गा
गजा नाचतो रं कसा गजा नाचतो गा
अवं सोंड फिरं गरारा अन् पोट वाजं नगारा
अवं लाडं लाडं मारतो कसा आभाळात फवारा
अन् ढगाच्या गा रूपानं ह्यो पाणी पाजतो गा
अवं ठुमक ठुमक बशितो अन् नादामंदी उठितो
अरं खेळाची ही नशा रं, कसं दोन्ही डोळं मिटितो
अन् इंद्राचा ऐरावत ह्येला लाजतो गा
गीत | - | जगदीश खेबूडकर |
संगीत | - | राम कदम |
स्वर | - | चंद्रशेखर गाडगीळ |
चित्रपट | - | झुंज |
गीत प्रकार | - | चित्रगीत, प्रथम तुला वंदितो |
हलगी | - | खंजिरी. एक प्रकारचे वाद्य. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.