A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
अलौकिक दत्तात्रय अवतार

तिन्ही लोकांतून चराचरांतून एक घुमे उद्गार
अलौकिक दत्तात्रय अवतार

अनसूयेचे सत्त्व आगळे
तिन्ही देवही झाली बाळे
प्रगटे भूवर जगद्गुरू हा करण्या जगतोद्धार

अवघी भुवने करीत पावन
फिरत राहिले दत्त दयाघन
गंगा स्‍नान करविरी भोजन, असा नित्य संचार

श्री औदुंबरी कृष्णाकाठी
यतीवेषे दत्तात्रय वसती
मूढ बालका करिती पंडित घडतो साक्षात्कार

नरसिंहवाडी दिव्य संगमी
निवांत वसती सद्गुरू स्वामी
दरिद्रियाच्या निर्धन धामी वर्षती धन अनिवार

महाक्षेत्र श्री गाणगनगरी
भीमा अवरजा तीरी नरहरी
मृता उठविती शेत पिकविती, करिती लोकोद्धार