आकाशींच्या अंतराळीं
आकाशींच्या अंतराळीं
तारकांना तेज चढे
तुझीमाझी प्रीति जडे
परसांतल्या फुलांचा
वास कोनाकोनीं खुले
तुझामाझा श्वास मिळे
काजव्यांच्या प्रकाशांत
तरुलता एक होत
तुझेमाझे गळां हात
दूर निळ्या शेवटांत
व्योम-धरेचें मीलन
तुझेंमाझें आलिंगन
वारा पानांच्या दाटीत
किती कोंडलासा वाटे
तुझामाझा कंठ दाटे
आनंदाचें दहींवर
रात्र खालीं फार ढाळे
अश्रू तुझेमाझे डोळे
रातकिडे गीत गाती
अंगाई फुलांना लागे
आतां तूं-मी नको जागे !
तारकांना तेज चढे
तुझीमाझी प्रीति जडे
परसांतल्या फुलांचा
वास कोनाकोनीं खुले
तुझामाझा श्वास मिळे
काजव्यांच्या प्रकाशांत
तरुलता एक होत
तुझेमाझे गळां हात
दूर निळ्या शेवटांत
व्योम-धरेचें मीलन
तुझेंमाझें आलिंगन
वारा पानांच्या दाटीत
किती कोंडलासा वाटे
तुझामाझा कंठ दाटे
आनंदाचें दहींवर
रात्र खालीं फार ढाळे
अश्रू तुझेमाझे डोळे
रातकिडे गीत गाती
अंगाई फुलांना लागे
आतां तूं-मी नको जागे !
गीत | - | कवी अनिल |
संगीत | - | जी. एन्. जोशी |
स्वर | - | जी. एन्. जोशी |
गीत प्रकार | - | भावगीत |
टीप - • काव्य रचना- १९ जुलै १९२३. |
दहिंवर | - | दंव. |
परसू (परसदार) | - | घराच्या मागील खुली जागा. |
व्योम | - | आकाश. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.