अजिंक्य हिंदुस्थान अमुचा
अजिंक्य हिंदुस्थान ! अमुचा ! अजिंक्य हिंदुस्थान !
युद्धखोर वैर्यांनों ऐका जनतेचे आव्हान !
हा भारतवर्ष महान, हा वसुंधरेचा प्राण
हें उंच तिरंगी निशाण, हें स्वातंत्र्याचें वाण
हे राष्ट्रीयतेचें सदन, हें लोकयुगाचे वतन
राहु-केतुस उधळीत चाले नव्या जगाचा भान
या जन्मभूमिच्या पोटीं जन्मतो स्वराज्यासाठीं
ही वीररसाची माती, घडविते जिणें पोलादी
मृत्युला धारातीर्थी जिंकितो स्वराज्यासाठी
रोमरोमीं स्वातंत्र्य नाचते आत्मा राष्ट्रनिशाण
हे दुश्मन येथें शिरले, ते कडेकपारी चिरले
जे कडेकपारी चिरले, थडगेही आम्हीच पुरले
आमुच्यावर कोणी फिरले किं दिवस तयांचे भरले
गर्जत 'जय जय हिन्द' करूंया शत्रूंचे शिरकाण

गीत | - | शाहीर आत्माराम पाटील |
संगीत | - | बाळ चिटणीस |
स्वर | - | शाहीर साबळे |
गीत प्रकार | - | स्फूर्ती गीत |
टीप - • १९६२ च्या चिनी आक्रमणाच्या वेळेस लिहिलेले गीत. |
कपार | - | खबदड. |
वसुंधरा (वसुधा, धरा) | - | पृथ्वी. |
शिरकाण | - | हत्या. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.