ऐसे कैसे जाले भोंदू
ऐसे कैसे जाले भोंदू ।
कर्म करोनि ह्मणति साधु ॥१॥
अंगी लावूनियां राख ।
डोळे झांकुनी करिती पाप ॥२॥
दावुनि वैराग्याची कळा ।
भोगी विषयांचा सोहळा ॥३॥
तुका ह्मणे सांगों किती ।
जळो तयांची संगती ॥४॥
कर्म करोनि ह्मणति साधु ॥१॥
अंगी लावूनियां राख ।
डोळे झांकुनी करिती पाप ॥२॥
दावुनि वैराग्याची कळा ।
भोगी विषयांचा सोहळा ॥३॥
तुका ह्मणे सांगों किती ।
जळो तयांची संगती ॥४॥
गीत | - | संत तुकाराम |
संगीत | - | |
स्वर | - | गंगाधर लोंढे |
गीत प्रकार | - | संतवाणी |
भावार्थ
तुकाराम महाराज म्हणतात, "अरेरे! असे कसे भोंदू लोक झाले आहेत. कुकर्मे करतात आणि स्वतःला साधू म्हणवून घेतात. हे लोक सर्वांगाला राख फासतात आणि चोरूनमारून पापकर्म करतात. लोकांत वैराग्य मिरवितात पण विषयांचे भोग यथास्थित घेतात. अशा भोंदू लोकांच्या कुकर्माचे किती वर्णन करावे? अशांच्या संगतीला आग लागो."
डॉ. प्रा. जे. बी. शिंदे
देवमुक्त, धर्ममुक्त तुकारामांची गाथा
सौजन्य- स्वरूप प्रकाशन, पुणे-कोल्हापूर.
* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.