अधीर मन झाले
अधीर मन झाले
मधुर घन आले
धुक्यातुनी नभातले
सख्या, प्रिया
सरीतुनी सुरेल धुंद
स्वर हे आले !
मी अशा रंगाची
मोतिया अंगाची
केवड्या गंधाची
बहरले ना !
उमगले रानाला
देठाला पानाला
माझ्या सरदाराला
समजले ना !
आला रे
काळजा घाला रे
झेलला भाला रे
गगनभरी झाले रे !
सोसला वारा मी
झेलल्या धारा मी
प्यायला पारा मी
बहकले ना !
गावच्या पोरांनी
रानाच्या मोरांनी
शिवारी सार्यांनी
पाहिले ना !
उठली रे
हुल ही उठली रे
चालरीत सुटली रे
निलाजरी झाले रे !
मधुर घन आले
धुक्यातुनी नभातले
सख्या, प्रिया
सरीतुनी सुरेल धुंद
स्वर हे आले !
मी अशा रंगाची
मोतिया अंगाची
केवड्या गंधाची
बहरले ना !
उमगले रानाला
देठाला पानाला
माझ्या सरदाराला
समजले ना !
आला रे
काळजा घाला रे
झेलला भाला रे
गगनभरी झाले रे !
सोसला वारा मी
झेलल्या धारा मी
प्यायला पारा मी
बहकले ना !
गावच्या पोरांनी
रानाच्या मोरांनी
शिवारी सार्यांनी
पाहिले ना !
उठली रे
हुल ही उठली रे
चालरीत सुटली रे
निलाजरी झाले रे !
गीत | - | गजेंद्र अहिरे |
संगीत | - | अजय-अतुल |
स्वर | - | श्रेया घोषाल |
चित्रपट | - | निळकंठ मास्तर |
गीत प्रकार | - | चित्रगीत, मना तुझे मनोगत, ऋतू बरवा |
शिवार | - | शेत. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.