अधांतर
नियती ऐसा खेळ रंगवी, सुन्न घराच्या उंबर्यावरी
गर्द घनाचे सावट पसरे शुभ्र गोजिर्या क्षितिजावरी
विणता-विणता का विखरावे नात्यांमधले चांदण-मोती
घडून गेला काय गुन्हा की क्रूर जाहली अगाध नियती
आयुष्याच्या सुखदु:खांची दिशा ठरवितो शुभंकर
मार्ग शोधता प्रत्येकाचे पाऊल पडते- अधांतर

गीत | - | रघुनंदन बर्वे |
संगीत | - | अशोक पत्की |
स्वर | - | |
गीत प्रकार | - | मालिका गीत |
टीप - • शीर्षक गीत, मालिका- अधांतर, वाहिनी- ई टीव्ही. • या गीताचे मूळ ध्वनीमूद्रण आमच्याकडे नाही. आपल्याकडे असल्यास, कृपया aathavanitli.gani@gmail.com या इ-पत्त्यावर पाठवा. ते रसिकांना ऐकण्यासाठी इथे उपलब्ध करून दिले जाईल. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.