अभंगाची गोडी करी
अभंगाची गोडी करी ज्यास वेडी
तोचि पुण्य जोडी, पंढरीचे
टाळ मृदंगाची वीणा साथ ज्याची
भक्ती पाहि तोची, विठ्ठलाची
बघा संतमेळा सदा रंगलेला
तिरी बैसलेला, देवापाशी
माहेर आपुले मंदिर तेथले
संत गुंगलेले, जनात
गाभार्यात कोण उभा विठु जाण
चोखोबा तिष्ठत, अंगणात
पहा हा सोहळा मोक्षाचा उमाळा
पुण्य पदराला, बांधावे हो
तोचि पुण्य जोडी, पंढरीचे
टाळ मृदंगाची वीणा साथ ज्याची
भक्ती पाहि तोची, विठ्ठलाची
बघा संतमेळा सदा रंगलेला
तिरी बैसलेला, देवापाशी
माहेर आपुले मंदिर तेथले
संत गुंगलेले, जनात
गाभार्यात कोण उभा विठु जाण
चोखोबा तिष्ठत, अंगणात
पहा हा सोहळा मोक्षाचा उमाळा
पुण्य पदराला, बांधावे हो
गीत | - | शांताबाई जोशी |
संगीत | - | दशरथ पुजारी |
स्वर | - | सुमन कल्याणपूर |
गीत प्रकार | - | विठ्ठल विठ्ठल, भक्तीगीत |
गाभारा | - | देवालयात देवाची मूर्ती असते तो अंतर्भाग. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.