A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
आवडीनें भावें हरिनाम

आवडीनें भावें हरिनाम घेसी ।
तुझी चिंता त्यासी सर्व आहे ॥१॥

नको खेद धरूं कोणत्या गोष्टीचा ।
पति तो लक्ष्मीचा जाणतसे ॥२॥

सकळ जीवांचा करितो सांभाळ ।
तुज मोकलील ऐसें नाहीं ॥३॥

जैसी स्थिति आहे तैशापरी राहें ।
कौतुक तूं पाहें संचिताचें ॥४॥

एका जनार्दनीं भोग प्रारब्धाचा ।
हरिकृपे त्याचा नाश आहे ॥५॥