आठवतो का बालपणा
आठवतो का बालपणा तुज?
बालपणातील सहवासाच्या थोर जाहल्या आज खुणा
उद्यानातील ही पुष्करणी
हळूच खुडिली कमळे कोणी?
कुणी गुंफिला हार मनोहर आणि वाहिला सांग कुणा?
इथे रुजविली कुणी मालती?
कुणी घातला मांडव भवती?
कळ्यांत पण या तुझाच दिसतो अबोल सुंदर गोडपणा
झुके डहाळी तरू मोहरला
त्यास बांधला कुणी हिंदोला?
कुणी चढविला वरती झोला हात लाविण्या रे गगना?
आठवतो मज बालपणा

गीत | - | ग. दि. माडगूळकर |
संगीत | - | सुधीर फडके |
स्वर | - | बालकराम, ललिता फडके |
चित्रपट | - | मायाबाजार (ऊर्फ वत्सलाहरण) |
गीत प्रकार | - | चित्रगीत, युगुलगीत |
झोला | - | झोका. |
तरुवर | - | तरू / झाड. |
पुष्करिणी | - | तळे. |
हिंदोल (हिंडोल) | - | झुला, झोका. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.