A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
आता कशाला उद्याची बात

मराठी -
आता कशाला उद्याची बात?
बघ उडुनि चालली रात !
भरभरूनि पिऊ
रसरंग नऊ
चल, बुडुनि जाऊं रंगांत
हा ज्वानीचा बहार, लुटू या
भरंवसा न ज्वानीचा
दो दिन ही साथ
हांसत करि घात !

हिंदी-उर्दू -
फूल सा जिस्म पुर बहार में हैं
आ लिपट इसका लुत्फ प्यार में हैं ॥
इस जवानी का ऐतिबार नहीं
सुन, ज़ईफ़ भी इन्‍तजार में हैं
(भावार्थ- हे फुलासारखे शरीर पूर्ण भरांत आले आहे ! ये, मिठी घाल. याची सारी मौज प्रेमात साठविली आहे ! या तारुण्याच्या काही भरवसा नाही. आणि ऐक ! म्हातारपण देखील टपून बसले आहे !)

गुजराथी -
कंसार राखिया घेवर तारे काजे !
पकवान पड्यां सामे खाइले आजे !
कारण, ते स्वाद हशे नहीं
ते दांत हशे नहीं
काल केम खाशे?
(भावार्थ- कंसार, घेवर यासारखी पक्वान्‍ने तुझ्यासाठी ठेविली आहेत. ही पुढं पडलेली पक्वान्‍ने आजच खाऊन घे ! कारण उद्या तुझे दात राहणार नाहीत आणि चवही राहणार नाही, मग तू काय खाणार?)

पंजाबी -
वेख चम्बेने पैलाँ पाइयाँ । मोतीये दीयाँ
आज्ज लुटलैय्ये । मौज बहाराँ
ए कल न रैणगियाँ
तेरे सुंगण दीयाँ । टुट्टणताराँ
(भावार्थ- मोराप्रमाणे हर्षनृत्य करणारी ही चम्पा आणि मोतियाची फुलं पहा ! त्यांच्या सुगंधाने सारे वातावरण दरवळले आहे. आजच त्यांचा आस्वाद घे ! कारण हे सर्व उद्या टिकणार नाही. आणि तुझे घाणेंद्रिय देखील उद्या क्षीण होईल !!)

बंगाली -
खोलो आजी खोलो नयन दुआर्‌
शोंधाय्‌ आनोमोने, शोंधो मुनीर बोने
शोंधा मुनीर रूपे, ऐशे छे जो आर्‌
के जाने प्रोभात्‌ रॉबे आंखी ते त्रिशा? के जाने प्रोभात्‌ हॉबे आजी ए निशा?
क्रीष्णोचुडार पाशे चम्पा जे मृदु हाशे
हॉय तो एमोनी कोभू हाशीबेना आर्‌ !!!
(भावार्थ- तुझे नेत्रद्वार आजच उघड (आणि पहा) या संध्यासमयी पुष्पराज 'संध्यामुनीं'च्या वनांत, बहरलेल्या पुष्पांच्या रूपानं सौंदर्याला भरती आली आहे. तुझ्या नेत्रांतील सौंदर्यतृषा उद्याही अशीच राहील कशावरून? आणि उद्याची सकाळ होणार आहे हे तरी कशावरून? ही कृष्णचूडार आणि चम्पा पुष्पें एकमेकांच्या सान्‍निध्यात स्मिहास्य करीत डुलत आहेत ! कदाचित ती आतासारखी पुन्हा कधी हसणारही नाहीत !)

तमिळ -
इन्‍निशै गानत्तिल् वीणैयिन्‌ नाद्मुं
ओलीक्कुं संगीदतै ओर्मयूडन्‌ केळीर्‌
एनेनिल्‌ नाळैयो शेविहळ् मंगीडलामे
वानोर्‌ पुक्‌हळ गानं वाहुडने इपोदे
(भावार्थ- हा श्रुतिमधुर वीणानाद आणि संगीतध्वनी याच घडीला श्रवण कर ! कारण तुझी ऐकण्याची शक्ती उद्या कमी होईल. त्यासाठी हे स्वर्गीय संगीत आताच ऐक !)